सारं कसं शांत शांत
१९४५ सालानंतर युद्धे झालीच नाहीत असे नाही. तीनेकशे झाली आहेत. हे खरे आहे की जगभरात सगळीकडे लोक लढून मेले नाहीत. ते फक्त इंडोनेशिया, ग्रीस, व्हिएतनाम, भारत, बोलिव्हिया, पाकिस्तान, चीन, पाराग्वे, येमेन, मादागास्कर, इझरायल, कोलंबिया, कोस्टा रिका, कोरिया, इजिप्त, जॉर्डन, लेबेनॉन, सीरिया, ब्रह्मदेश, मलेशिया, फिलिपीन्स, थायलंड, ट्युनिशिया, केनिया, तैवान, मोरोको, ग्वाटेमाला, आल्जीरिया, कॅमेरून, हंगेरी, हैती, रवांडा, …